छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) लाडसावंगी - भाकरवाडी रस्त्यावर सिमेंट कॉक्रेटीकरण करण्यासाठी रस्ता खोदून ठेवून पाच महिने झाले, परंतु रस्त्याचे काम बंद पडल्याने रस्त्यावर जाणारे येणारे वाहानामुळे धुळ उडून परिसरातील संपूर्ण पिकं वाया गेली आहे.
लाडसावंगी - भाकरवाडी रस्त्यावर सिमेंट कॉक्रेटीकरण व रुद्दीकर करण्यासाठी चांगला डांबर रस्ता खोदून ठेवला व त्यावर मुरुम व माती पसरून ठेवून सहा महिने झाले परंतु सदरील रस्त्यावर सिमेंट कॉक्रेटीकरण न करता रस्त्याचे काम बंद पडल्याने त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची धुळ उडून रस्ता लगत ची पिंक धुळीने खराब झाली आहे.विशेष म्हणजे हा रस्ता पैठण व सिल्लोड राज्य महामार्ग म्हणून ओळखले जातो.या रस्त्यावर वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने धुळ उडून कापूस तुर मका गहू आदी पिकावर धुळ बसून संपूर्ण पिकं वाया गेली आहे.
आधीच अतिवृष्टीमुळे खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले.आता धुळीने रब्बी हंगामातील पीक वाया जाणार असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सदरील रस्त्यावर धुळ उडून पिक वाया जात असल्याने संबंधित ठेकेदार यांना रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे व पाणी मारण्याच्या सुचना केल्या आहे.हरसिंग ठाकूर उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर माझे तिन एकर शेती रोड लगत आहे.
त्यात कापसाचे पीक आहे धुळीमुळे मंजूर कापूस वेचणी साठी येण्यास तयार होत नसल्याने संपूर्ण पिकं तसेच वाया जाणार आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन रस्त्यावर पाणी न मारणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
- उद्धव पडूळ शेतकरी, लाडसावंगी.
- उद्धव पडूळ शेतकरी, लाडसावंगी.
















